मुंबई मेट्रो ४ मधील पॅकेज १२ अंतर्गत मैलाचा दगड

मुंबई। मुंबई मेट्रो ४ च्या पॅकेज १२ अंतर्गत कापुरबावडी मेट्रो स्थानक हे मुंबई मेट्रो ४ व ५ या दोन मेट्रो वाहिन्यांचे एकत्रिकरण ( Integration) स्थानक नियोजित आहे. सदरमुळे, सदर स्थानकाचे बांधकाम, उभारणी ( Erection) इ बाबी तांत्रिक द्रुष्ट्या कमालिचे गुंतागुंतीचे आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अभियंत्याच्या मार्गदर्शनाखाली सदर पॅकेजच्या मे. मिलन ह्या उप कंत्राट कंपनीने सदर आव्हान पेलण्यासाठी संपुर्ण सक्षमता वापरली असुन त्याअनुषंगाने काल दि १४/१२/२०२४ च्या रात्री कापुरबावडी च्या integrated station च्या तिन पियरच्या पोर्टल बिमवरिल यु गर्डर ची उभारणी यशस्वीपणे पुर्ण केली.

सदरची बाब महत्वाची अशासाठी कि घोडबंदर रस्त्यावरील अवजड वाहनांची वाहतूक वर्दळ व कोंडी ही सर्वश्रुत आहे. सदर ची वाहतूक कोंडी पाहता रात्री च्या मर्यादित वेळात सदर ची उभारणी पुर्ण करुन दुसर्या दिवसाच्या सकाळ ची नागरिकांची वाहतुक सुरु होण्यापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी पुर्ण पणे मोकळा करुन देणे हे हि दिव्यच असते. त्याही परिस्थितीत सदरची बाब म्हणजे ४ यु गर्डर एका रात्रीत उभारणी पुर्ण करण्याचे साध्य केले. तेही सर्व तांत्रिक बाबींचे निकष पुर्ण करुन सुरक्षितता खात्री करुन आणी वाहतूक कोंडी होउ नये याद्रुष्टीने वाहतुक वळणाचे उत्क्रुष्ठ नियोजन करुन.

तिन पियर पोर्टल मुळे क्रेनची उभी राहण्याची स्थिती व गर्डर वाहुन आणणारा ट्रेलर उभी करण्याची स्थिती, आजुबाजुच्या इमारतींचा अडसर इ बाबींचा विचार करुन तांत्रिक नियोजन व वाहतुक वळणाचे नियोजन इ आव्हाने पेलवुन 4 यु गर्डर ची उभारणी यशस्वी करण्यात आली. हा मेट्रो कामामधील लक्षणीय मैलाचा दगड ठरणार आहे…
सदर साठी प्रत्येकी ५०० व ५५० टन क्षमतेच्या दोन अवजड क्रेन्स, गर्डर वाहुन नेण्यासाठी ४ मल्टीॲक्सल पुलर, कांउंटर वजन वाहुन नेण्यासाठी ६ ट्रेलर, ५मॅन लिफ्टर्स, ४ हायड्रा, २ ॲम्बुलन्स, १०० विविध तज्ञ-कुशल कामगार
३० वार्डन लाईटनिंग बॅटन बरोबर ची व्यवस्था, वाहतुक वळण व्यवस्था, आणीबाणी परिस्थिती साठी पर्यायी व्यवस्था इ नियोजित करण्यात आले.

यासाठी ठाणे शहर वाहतुक पोलिसांचे सहकार्य मोलाचे व महत्वाचे ठरले आहे. सदर ४ यु गर्डर उभारणी चे साध्य विहित वेळेत म्हणजेच काल रात्री ११.०० ते आज सकाळी ७.०० दरम्यान च्या काळात नियोजन प्रमाणे पुर्ण करण्यात आले.
सदर यशस्वीतते मुळे पुढील मेट्रो उभारणारणीचे कामासंबंधीचा आत्मविश्वास उंचावणारा ठरणार आहे.